१९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त पुण्यात क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर अडीच एकरात शिवारायांची सिंहसना धिष्टीत भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. त्याची उद्घाटन पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.मंगेश निपाणीकर या कलाकाराने ही रांगोळी साकारली आहे, यासाठी ५० हजार किलो विविध रंगांची रांगोळी वापरण्यात आली आहे. ही रांगोळी जगातील सर्वात मोठी रांगोळी असल्याचा दावा कलाकाराने केला असून गिनीजच्या तज्ञांकडून त्याची पाहणी होणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews